शेतकऱ्यांच्या हितासाठीच प्रकल्प आराखड्यानुसार निळवंडे धरणाचे काम करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील निळवंडे  प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न

मुंबई, दि. 11 : शेतकऱ्यांच्या हितासाठीच अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करत असताना स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन प्रकल्प आराखड्यानुसारच काम करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

 निळवंडे, जि. अहमदनगर येथील प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी निळवंडे धरणासाठी संपादित केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पाण्याचा हक्क मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी कार्यरत असलेल्या उपसा सिंचन योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करुन उपसा सिंचन योजना सुरळीत करण्यात येईल. तसेच प्रवरा नदीतील प्रोफाईल वॉलचे काम, म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम, राजूर पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल.

 निबंळ येथील जलविद्युत प्रकल्पात ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा लोकांना जमिनी वाटप प्रकरणाची चौकशी करावी. जे नियमात आहे, त्यानुसारच जमीन वाटप करण्यात यावी. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत भंडारदरा व निळवंडे धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बुडीत बंधारे बांधण्यात यावे. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या पाणी नियोजनात केंद्रीय जल आयोग सूचनानुसार आढळा धरणाच्या लाभक्षेत्रास बाधा न पोहचवता परिसरातील इतर क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यात आली. माळेगाव-केळूंगण उपसा सिंचन योजना आणि राजूर, शेलविहीरे, बाभुळवंडी, देवगांव, टिटवी उपसा सिंचन योजना, निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल उपस्थित होते.
0000


किसानों के हित के लिए प्रकल्प के

प्रारूप के अनुसार निलवंडे बांध का काम
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : किसानों के हित के लिए अहमदनगर जिले के निलवंडे बांध का काम शुरू है. यह काम पूर्ण करते समय स्थानिक तथा प्रकल्प पीड़ित किसानों की मांगों को ध्यान में लेकर ही प्रकल्प प्रारूप के अनुसार ही काम किया जाएगा, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किसानों को बताकर आश्वस्त किया.
 निलवंडे, जि. अहमदनगर के प्रकल्प पीड़ित और नहर पीड़ित किसानों की प्रलंबित मांगों के संदर्भ में मंत्रालय में बैठक आयोजित की थी. इस समय मुख्यमंत्री बोल रहे थे. इस समय जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित थे.
मुख्यमंत्री ने कहा, जिन किसानों की जमीन निलवंडे बांध के लिए संपादित की गई है, उन किसानों को पानी का अधिकार मिलना होगा. किसानों को पानी उपलब्ध हो इसके लिए कार्यरत उपसा सिंचाई योजना का फिर से सर्वेक्षण कर उपसा सिंचाई  योजना सुचारू की जाएगी. साथ ही प्रवरा नदी के प्रोफाईल वॉल का काम, म्हालादेवी के जलसेतू का  काम, राजूर पिंपरकणे ओव्हरब्रिज का काम जल्द ही पूरा किया जाएगी.
 निबंल के जलविद्युत प्रकल्प में जिन लोगों की जमीनें गई है, ऐसे लोगों के जमीन वितरण मामले की जांच हो. नियम के अनुसार जमीन का वितरण किया जाएगा. प्रकल्प के काम समय पर पूर्ण करने के लिए प्रकल्प पीड़ित किसान और प्रशासन ने समन्वय के साथ का कारण होगा ऐसा मुख्यमंत्री ने बताया. 
इस बैठक में भंडारदरा और निलवंडे बांध के क्षेत्र के नागरिकों के लिए पीने का पानी उपलब्ध हो इज़के लिए छोटे बांध निर्माण करने. उर्ध्व प्रवरा प्रकल्प के पानी नियोजन में केंद्रीय जल आयोग सूचना के अनुसार आढला बांध के लाभक्षेत्र को बाधा न पहुंचते हुए  परिसर के अन्य क्षेत्र के संदर्भ में चर्चा की गई.  मालेगाव-केलूंगण उपसा सिंचन योजना और राजूर, शेलविहीरे, बाभुलवंडी, देवगांव, टिटवी उपसा सिंचन योजना, निलवंडे प्रकल्प पीड़ितों का पुनर्वसन आदि विषयों ओर चर्चा की गई. 
इस समय सांसद सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटिल, विधायक शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, पूर्व मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे-पाटिल, जलसंपदा विभाग के प्रधान सचिव आय. एस. चहल उपस्थित थे.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा