जर्मनीच्या नव्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : जर्मनीचे भारतातील नवनियुक्त राजदूत वाल्टर लिंडनर यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षा एंजेला मर्केल नोव्हेंबर महिन्यात भारत भेटीवर येत असून त्यावेळी त्या मुंबईला देखील भेट देणार असल्याची माहिती लिंडनर यांनी दिली.

भारत आणि जर्मनी या देशांमधील संबंध परस्पर विश्वासावर आधारित असून आगामी काळात ते अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास लिंडनर यांनी व्यक्त केला.

जर्मनी भारताला गंगा शुद्धीकरण, नूतनीकरणक्षम ऊर्जा, कृषी, युनेस्को प्रणित व्याघ्र संवर्धन, इत्यादी अनेक विषयांवर सहकार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जर्मनी-भारत संबंध अधिक व्यापक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना जर्मनीने महाराष्ट्रातील विद्यापीठांशी, विशेषतः संस्कृत विद्यापीठाशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जूर्गन मॉर्हार्ड यावेळी उपस्थित होते.
००००


Newly appointed German Ambassador meets Governor
Mumbai, 6th June : The newly appointed Ambassador of Germany to India Walter Lindner called on the Governor of Maharashtra CH. Vidyasagar Rao at Raj Bhavan, Mumbai on Thursday (6th June).
The Ambassador told the Governor that the Chancellor of Germany Angela Merkel is likely to visit India in November this year during which she will also visit Mumbai.
The Ambassador said, that Germany and India have always enjoyed excellent relations.  Mentioning that Germany is partnering with India in cleaning Ganga river, he said Germany is also cooperating with India in renewable energy, agricututre and UNESCO- sponsored project of protecting tigers.
The Governor said, in his capacity as Chancellor of 20 state-suppoted univerties in Maharashtra, he would welcome cooperation between universities in Germany and those in Maharashtra, especially with the Sanskrit University.

Consul General of Germany in Mumbai Jurgen Morhard was also present.
००००कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा