तोडगाव औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी कार्यवाही करा- अतुल सावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 27 : अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील तोडगाव एम. आय. डी. सी. साठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात यावी. तसेच या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्या, अशा सूचना उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी आज येथे दिल्या.

तोडगाव एम. आय. डी. सी. च्या प्रलंबित समस्यांबाबत श्री. सावे यांनी आज विधानभवन येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

अचलपूर एम. आय. डी. सी. येथे विकसित करण्यात आलेल्या आराखड्यातील अधिग्रहित केलेल्या काळ्या कसदार जमिनीऐवजी औद्योगिक क्षेत्राच्या पश्चिमेकडील महामंडळाच्या हद्दीलगतची जमीन संपादित करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजुसिंग पवार आणि उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा