धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी समाजात 'वृक्ष भाव' रुजविण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 7 :  सर्व धर्मात वृक्ष पूजनीय असून  पर्यावरणात नारायण आहे  ही शिकवण प्रत्येक धर्मातून मिळते असे सांगून त्याग, सेवा, मानवता भाव या बरोबर धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी  समाजात 'वृक्ष भाव' रुजवावा असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आज सह्याद्री अतिथीगृहात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने वनमंत्री श्री. मुनगंटीवार समाजातील सर्व घटकांची बैठक घेऊन त्यांना वृक्ष लागवडीच्या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. सुरुवातीला त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस बुराणी फाउंडेशन, ईशा फाउंडेशन, बाबुलनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिर, अनिरूद्ध अकादमी, पतंजली, ब्राह्मकुमारी आश्रम, आर्ट ऑफ लिव्हिंग आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


आपण आपापल्या क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहात, आपल्या शब्दाला मान आहे त्याचा उपयोग वृक्ष लावण्याची भावना समाजातील लोकांच्या मनात निर्माण करण्यासाठी करावा, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, अनेकांकडे वृक्ष लागवडीसाठी जागा नसते परंतु पर्यावरणाचे सेनापती बनून ते वृक्ष लागवडीचा संदेश देऊ शकतात, समाज माध्यमांचा उपयोग करून  वृक्ष लागवडीस प्रोत्साहित करू शकतात . सूरज ना बन पाये तो बन के दीपक जलता चल, ही भावना मनात ठेवून वृक्ष लागवडीचा दीप प्रज्वलित करू शकतात. 1926 या वन विभागाच्या हेल्पलाईन वर फोन करून वन, वन्य जीव संरक्षण आणि संवर्धनात सहभागी होऊ शकतात. मिले सूर मेरा तुम्हारा या उक्ती प्रमाणे आपल्या लाखो अनुयायांशी संवाद साधून, चर्चा करून वृक्ष लागवडी चे मिशन विस्तारित करू शकतात. "देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून" असे आपण म्हणतो. वृक्षात देव आहे अस आपण मानतो, मग या देवकार्यात सहभागी होणे आपलं कर्तव्य आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे असेही ते म्हणाले. महादेवाला नीलकंठ असेदेखील म्हटले जाते कारण त्यांनी विष प्राशन केले, वृक्ष ही तेच काम करतात वातावरणातील कार्बनडायऑक्साईड शोषून घेऊन ते आपल्या जगण्यासाठी प्राणवायू देतात. वृक्षांमध्ये देवत्व आहे असे उदाहरणही त्यांनी दिले.

वृक्ष लागवड कार्यक्रमात पारदर्शकता महत्वाची असल्याचे सांगून श्री मुनगंटीवार यांनी या कामात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून लावलेल्या प्रत्येक रोपांचा लेखाजोखा  ठेवला जात असल्याचे सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक
प्रत्येक जिल्ह्यात, विभागात वृक्ष  लागवडीच्या कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींना ते या कामात मदत करतील अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना आपण फलोत्पादन क्षेत्राकडे नेत असल्याचे सांगून ॲग्रो आणि ऑरगॅनिक फार्मिंग ला शासन  प्रेरणा देत  आहे. बांबू, रेशीम आणि फलोत्पादन कामातून लोकांना वनापासून धनापर्यंत नेत असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण कामात आपण स्थानिक 156 प्रजातीची रोपे लावत  असल्याची माहिती ही त्यांनी दिली. जिथे 30 टक्क्यांपेक्षा जास्त वन क्षेत्र आहे तिथे टँकर ची गरज पडत नसल्याचे  ते म्हणाले. आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या संस्थांनी 100 गावे दत्तक घेऊन ती हरित करावीत, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  


ज्यांच्याकडे वृक्ष लावण्यासाठी जागा नाही त्यांनी प्रसाद रूपाने मंदिरात येणाऱ्या भक्तांना रोपे वाटावीत असे वन  विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.  बैठकीत  वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने सादरीकरण करून मिशनची माहिती दिली.
0000


पर्यावरण में "नारायण"
त्याग, सेवा, मानवता भाव के साथ "वृक्ष भाव" बढ़ाएँ
धर्मगुरू की बैठक में वन मंत्री सुधीर मुनगंटीवार का आवाहन
मुंबई, दि. 7 :  सभी धर्मों में वृक्ष की पुजा होती है और पर्यावरण में "नारायण" है, यह संस्कार प्रत्येक धर्म से मिलता है, यह बताते हुए त्याग, सेवा, मानवता भाव के साथ-साथ धार्मिक संस्थाओं के प्रतिनिधियों ने समाज में "वृक्ष भाव" रखने का आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने किया।
आज सह्याद्री अतिथिगृह में वन मंत्री ने 33 करोड़ वृक्षारोपन के अवसर पर समाज के सभी घटकों की बैठक लेकर उन्हें वृक्षारोपन के मिशन में शामिल होने का आवाहन कर रहे है। शुरुआत में उन्होंने  विविध धार्मिक संस्थाओं प्रतिनिधियों की बैठक ली, इस बैठक में वे बोल रहे थे। बैठक में बुराणी फाउंडेशनईशा फाउंडेशनबाबुलनाथ मंदिर, महालक्ष्मी मंदिरअनिरूद्ध अकादमी, पतंजलि, ब्राह्मकुमारी आश्रम, आर्ट ऑफ लिविंग आदि संस्थाओं के प्रतिनिधि उपस्थित थे।
इस दौरान श्री. मुनगंटीवार ने कहा कि विविध उदाहरण देते हुए बताया कि हम अपने-अपने क्षेत्र के प्रभावशाली व्यक्तिमत्व रखते है, अपने शब्दों में मान-सन्मान है, उसका उपयोग समाज के लोगों में वृक्ष लगाने की भावना निर्माण करने के लिए करना चाहिए। कई लोगों के पास वृक्षारोपन के लिए जगह नहीं होती, लेकिन पर्यावरण के सेनापति बनकर वह वृक्षारोपन का संदेश दे सकते है। समाज माध्यमों का उपयोग कर वृक्षारोपन के लिए प्रोत्साहित कर सकते है। सूरज ना बन पाये तो बन के दीपक जलता चल, यह भावना मन में रखकर वृक्षारोपन का दीप प्रज्वलित कर सकते है। वन विभाग की 1926 इस हेल्पलाईन पर फोन करके वन, वन्य जीव संरक्षण और संवर्धन में शामिल हो सकते है।
 “मिले सूर मेरा तुम्हारा की तरह अपने लाखो अनुयायियों से  संवाद साधकर, चर्चा कर वृक्षारोपन का मिशन विस्तारित कर सकते है। "देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून" यह हम कहते है। वृक्ष में भगवान है यह हम समझते है। फिर इस भगवान के कार्य में भाग लेना हमारा कर्तव्य है, यह हर किसी को लगना चाहिए। महादेव को नीलकंठ भी कहा जाता है, क्योंकि उन्होंने विष प्राशन किया, वृक्ष भी वहीं काम करते है। वातावरण में जो कार्बन डायऑक्साईड है, उसे लेकर वह हमें ऑक्सीज़न देते है। वृक्षों में देवत्व है।
श्री. मुनगंटीवार ने बताया कि वृक्षारोपन कार्यक्रम में पारदर्शकता महत्वपूर्ण हैइस काम में सूचना प्रोद्योगिकी का उपयोग कर लगाए गए प्रत्येक पौधे का लेखा-जोखा जा रहा है।
प्रत्येक जिले में समन्वयक
प्रत्येक जिले में, विभाग में वृक्षारोपन के काम के लिए समन्वय अधिकारी की नियुक्ति की गई है और स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्थाओं के प्रतिनिधियों को वे इस काम में मदद करेंगे, यह जानकारी वनमंत्री ने दी। किसानों को हम फलोत्पादन क्षेत्र की ओर ले जा रहे है और अग्रों और ऑरगॅनिक फार्मिंग को सरकार प्रेरणा दे रही है। बांस, रेशीम और फलोत्पादन काम से लोगों को वन से धन तक ले जा रहे है। वृक्षारोपण के काम में हम स्थानीय 156 प्रजाति के पौधे लगाए जाने की जानकारी उन्होंने दी। जहां पर 30 फीसदी से अधिक वन क्षेत्र है, वहाँ पर टैंकर की आवश्यकता नहीं होती।  आर्ट ऑफ लिविंग जैसी संस्थाओं ने 100 गाँव गोद लेकर उसे हरा-भरा किया किया जाए, यह आशा भी उन्होंने इस दौरान व्यक्त की। 

बैठक में वन  विभाग के प्रधान सचिव विकास खारगे ने अपने प्रास्ताविक में बताया कि जिनके पास वृक्षारोपन के लिए जगह नहीं है, उन्होंने प्रसाद के रूप में मंदिर में आनेवाले भाविकों को पौधे वितरित करना चाहिए। बैठक में  वन विभाग के वरिष्ठ अधिकारियों ने 33 करोड़  वृक्षारोपन के मद्देनज़र प्रस्तुतीकरण कर मिशन की जानकारी दी।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा