श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्यासाठी १४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी 148.37 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात आज त्यांनी या विषयाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


या आराखड्यातील कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेगाने पूर्ण व्हावीत अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, आराखड्यातील जी कामे पूर्णत्वाला  आली आहेत, ती श्रावणापूर्वी पूर्ण होतील असे पाहावे.  आराखड्यात सामूहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते विकास, मंदिर परिसर संवर्धन , भाविकांसाठी पायाभूत सोयी सुविधा, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना ,घनकचरा व्यवस्थापन,  वीजपुरवठा, महादेव वन, विश्रामगृह, अशा विविध कामांचा समावेश आहे अशी माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले,  येथे उभारण्यात येत असलेल्या महादेव वन प्रकल्पांतर्गत विविध 12 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. येथे बेलाची 150 तर रुद्राक्षाची 100 झाडे लावली गेली आहेत. आराखड्यातील 14 कामे प्रगतीपथावर आहेत. भाविकांसाठी 20 मिडी बसेसची सेवा लवकरच सुरू होत आहे. पर्यटन विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या बॅटरी ऑपरेटेड गाड्याही श्रावणापूर्वी  सुरू होतील अशी अपेक्षा आहे. मंदिराला साजेशी कामे करताना ती उत्तम दर्जाची होतील याची काळजी घेतली गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मंदिराला लाखो भाविक भेट देतात हे लक्षात घेऊन  करण्यात येणारी कामे नाविन्यपूर्ण रितीने  केली जावीत. डमरू, वाहनतळ, लॉकर, कापडी पिशव्या तयार करण्याची कामे , बेलाच्या पानाच्या खताचा प्रकल्प अशी विविध कामे यात केली जावीत. भक्तांना जप आणि आराधना करण्यासाठी एक हॉल तयार केला जावा, यज्ञ करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एक यज्ञकुंड तयार केले जावे, ओम नमः शिवाय चा जप करणारा नंदी उभारला जावा,   दिव्यांगासाठी, जेष्ठ नागरिकांसाठी दर्शनाला जाण्याची व्यवस्था निर्माण केली जावी. रोजगार निर्मितीबरोबर नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंमलबजावणीत स्थानिकांचा सहभाग घेतला जावा, अशा सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या.
०००००

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर विकास योजना के लिए
148 करोड़ रुपये का फंड
- वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दिनांक 6: श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान और परिसर के विकास के लिए 148.37 करोड़ रुपये मंजूर किए गए हैं, वित्त और नियोजना मंत्री सुधीर मुनगंटीवार ने यह जानकारी दी है। आज सह्याद्री गेस्ट हाउस में आयोजित इस विषय की समीक्षा बैठक में वे बोल रहे थे।  नियोजन विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती भी इस बैठक में उपस्थित थे।
विकास योजना के मसौदे में गुणवत्तापूर्ण काम और तेजी से पूरे होने का निर्देश देते हुए श्री मुनगंटीवार ने कहा कि विकास योजना का जो काम पूरे होने आया हैं, उन कामों श्रावण महीने से पहले पूरा कर लिया जाना चाहिए।
इस मसौदे में सामूहिक सेवा केंद्र, प्रवेश द्वार, फुटपाथ, सार्वजनिक-स्वच्छ-घर, सड़क विकास, मंदिर परिसर संरक्षण, भक्तों के लिए बुनियादी सुविधाएं, जल आपूर्ति योजना, भूमिगत नाली, ठोस अपशिष्ट प्रबंधन, बिजली आपूर्ति, महादेव वन, विश्राम गृह आदि से संबंधित कामों का समावेश है।

मुनगंटीवार ने कहा कि यहां पर स्थापित किए जा रहे महादेव वन परियोजना के तहत 12 परियोजनाओं को मंजूरी दी गई है। यहां पर बेल का 150 और रुद्राक्ष का 100 पेड़ लगाए गए हैं। विकास योजना मसौदा के 14 काम प्रगति पर हैं। भक्तों के लिए जल्द ही 20 मिनी बसें शुरू की जा रही हैं। उम्मीद है कि श्रावन के पहले ही पर्यटन विभाग से खरीदी गई बैटरी संचालित गाड़ी को भी शुरू किया जाएगा। उन्होंने कहा कि मंदिर की सजावट को बनाए रखते समय यह ध्यान रखना चाहिए कि इस गुणवत्ता अच्छी होनी चाहिए। मंदिर में लाखों भक्तों का आने जाने की बात को ध्यान में रखते हुए दिए मंदिर का का अभिनव तरीके से किया जाना चाहिए। डमरू, पार्किंग स्थल, लॉकर, कपड़े का बैग तैयार करना, बेला पत्ती की खाद परियोजना सहित विभिन्न कामों को किया जाना चाहिए। भक्तों के जप और पूजा के लिए एक हॉल तैयार किया जाना चाहिए, यज्ञ करने वाले इच्छुक भक्तों के लिए एक यज्ञकुंड तैयार किया जाना चाहिए, ओम नमः शिवाय का जप करने के लिए नंदी तैयार किया जाए। दिव्यांग और वरिष्ठ नागरिकों के लिए दर्शन करने की व्यवस्था बनाई जानी चाहिए। वित्त मंत्री ने सुझाव दिया कि  रोजगार सृजन के साथ ही स्थानीय लोगों के नए विचारों का क्रियान्वयन में हिस्सा लेना चाहिए।
००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा