रत्नागिरी जिल्ह्यातील ८ तलावांच्या संवर्धनासाठी ३ कोटी ८५ लाखांचा निधी वाटप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 4 : पर्यावरण विभागातर्फे राष्ट्रीय तलाव सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 8 गावातील तलावांच्या संवर्धनासाठी 3 कोटी 85 लाख 26 हजारांचा निधी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आज मंत्रालयात वितरित करण्यात आला.


हा निधी तलावातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, दगडाचे पिचींग करणे, झाडे लावणे, गार्डन तयार करुन नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह बांधणे, वॉकिंग ट्रॅक तयार करणे, आदी कामासाठी वापराला जाणार आहे. हा तलाव संवर्धन निधी सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.
      

रत्नागिरी जिल्ह्यातील   शिरखल तलाव, दापोली,  शिरशिंगे तलाव, दापोली, संवेणी तलाव, खेड,  विन्हे तलाव, मंडणगड, उत्तरेश्वर तलाव, दहागाव, घेरासुमारगड, खेड, आणि विष्णू तलाव, लोणेरे - गोरेगाव (माणगाव) येथील तलावासाठी निधींचे वितरण करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ब्रिटिश कालीन तसेच पुरातन असलेले तलाव प्रदूषणमुक्त तसेच सुशोभित होणार आहेत.
००००००


For the Conservation of ८ Ponds in Ratnagiri District
Distribution of ३ crore ८५ lakhs Fund
Mumbai, June.  ४:  Under the National Talab Sarovar Samvardhan Yojana  the Environment Department has distributed a fund of Rs. 3 crore 85 lakhs 26 thousand  for the conservation of ponds of 8 villages in Ratnagiri district.
 This fund will be used for the purpose of removing the mud of ponds, increasing depth, pitching of stones, planting  trees,  seating arrangements for citizens , making washrooms, creating  walking track etc.   The pond conservation fund was accepted by Sarpanchs , Gramsevaks.

Funds were distributed for the ponds of the Shirkhal pond, Dapoli, Shirshing Pond, Dapoli, Samveni Pond, Khed, Vinhe Pond, Mandangad, Uttareshwar Pond, Dahagaon , Gherasumargarh, Khed and Vishnu Pond, ponds of Loner-Goregaon (Mangaon) in Ratnagiri district.  Through this scheme, the ponds of British period and ancient lakes will be made  pollution free and beautified.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा