‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या राजकुमार बडोले यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'तंबाखूमुक्त महाराष्ट्र' या विषयावर राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. संगीता अंभोरे आणि सलाम मुंबई संस्थेचे ग्रामीण प्रकल्प प्रमुख दीपक पाटील  यांची विशेष मुलाखत  घेण्यात आली आहे. ही  मुलाखत मंगळवार दिनांक जून रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी  7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी  ही मुलाखत घेतली आहे.
     

तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी शासनाचे उपक्रम,  तंबाखूमुक्तीसाठी सलाम मुंबई संस्था करत असलेले काम, तंबाखूजन्य पदार्थांचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आणि  तंबाखूच्या व्यसनापासून  सुटका होण्यासाठी करावे लागणारे उपाय आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. बडोले, श्री. पाटील आणि डॉ. संगीता अंभोरे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा