मियावाकी वृक्ष लागवड पद्धती 'अटल आनंद वन' योजना नावाने राबविणार - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 7 : मियावाकी वृक्ष लागवड पद्धती राज्यात अटल आनंद वन योजना या नावाने राबविणार असल्याचे व लवकरच यासंबंधीचे धोरण शासन मंजूर करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृहात आज त्यांनी राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, वन विभागाचे प्रधान सचिव  विकास खारगे, वन विभागाचे इतर अधिकारी यांच्यासह सी आय आय, एम सी एच आय, यंग इंडियन्स, टाटा मोटर्स, क्रिसल फाऊंडेशन, इंडियन ऑइल यासह इतर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


वृक्ष लागवड हा सर्वांचा सहजभाव झाला पाहिजे. तो जनजागृती करून निर्माण करता येईल असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, कमी जागेत अधिक वृक्ष लावून मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्माण करता येते. जिथे आपण 1  हेक्टर वर 1 हजार झाडे लावतो तिथे या पद्धतीने 30 हजार झाडे लावता येतात.  शहरांमध्ये जागेची कमी असते. तिथे या पद्धतीने कमी जागेत वृक्षलागवड करून जंगल निर्माण करता येईल.

कॉर्पोरेट  क्षेत्रातील मान्यवर त्रिपक्षीय करार करून  अशा पद्धतीच्या वन विकासात सहभागी होऊ शकतात, ग्रीन सिटी, ग्रीन स्कूल, ग्रीन बिल्डिंग करून हरित शहराचे स्वप्न साकार करू शकतात.  वृक्ष लागवडीसाठी रोपे स्पॉन्सर करून, लावलेल्या रोपांना टँकरने पाणी देण्याची व्यवस्था करून ती जगवण्याची हमी घेऊन, हे वृक्ष धनुष्य ते उचलू शकतात. आपल्या सामाजिक  दायित्व निधीतून  वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे मशीन देऊ शकतात. वृक्षांना पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन व्यवस्था निर्माण करू शकतात. वन्य जीवांमुळे शेतपिकाचे नुकसान होऊ नये म्हणून  चेनलिंक फेंसिंग ची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. इको टुरिझम, कांदळवन उपजीविका विकास कार्यक्रमात योगदान देऊ शकतात. या सर्व क्षेत्रात शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र येऊन खूप छान काम करू शकते, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वन विभाग भविष्यातील समृद्ध वाटचालीचा वाटाड्या

हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन लोकसहभागातून वन विभाग वृक्ष लागवडीचे जे काम करत आहे ते अतिशय अभिनंदनीय असून त्यांची ही वाटचाल महाराष्ट्राच्या समृध्द वाटचालीसाठी वाटाड्या प्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे अशी  प्रतिक्रिया  उपस्थितांनी दिली तसेच टाळ्या वाजवून वन विभागाचे कौतुक केले. 33 कोटी वृक्ष लागवडीत कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था, व्यक्ती पूर्ण ताकतीने वन विभागाच्या संकल्पात सहभागी  होतील अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली. वन विभागाच्या या अथक प्रयत्नानेच राज्य वनेतर क्षेत्रातील वृक्ष आच्छादनात देशात पाहिले आले आहे अशी भावना ही उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

वन विभागाने या वेळी उपस्थितांसमोर 33 कोटी वृक्ष लागवडीची माहिती देणारे सविस्तर सादरीकरण केले.
00000


The Miyabaki tree planting system to be implemented by the name Atal Anandsan Forest scheme
Policy in this respect to be declared soon
- Sudhir Mungantiwar
Mumbai dated 7 : The Forest Minister Shri Sudhir Mungantiwar today stated that the Miyabaki tree planting system will be implemented in the state by the name Atal Anandwan Forest scheme and the policy in this respect will be declared very soon .
He was speaking at a meeting with the eminent persons in the Corporate sector held at the Sahyadri State Guest house. The Member of legislature Shri Mangalprabhat Lodha, Principal Secretary to the Forest Department Shri Vikas Kharage, and other officials of the forest department along with the representatives from the Confederation of Indian Industries, Maharashtra Chamber of Commerce and Industries , Young Indians, Tata MOtors, Credit Rating and Information Systems India Foundation, Indian Oil. were present on the occasion ..
Shri Mungantiwar stated that planting the trees should become the natural instinct for any person which can be created through public awareness. He further stated that dense forest can be created by planting trees through Miyabaki method wherein thirty  thousand trees are planted on one hectare of land as against the conventional one thousand trees on the same area in the conventional method. There is scarcity of space in the cities, where this method of creating a forest by planting more trees in less space can be adopted. and a dense forest can be created. .
He further stated that the Corporate sector can take the lead in development of such type of forest by entering into tripartite agreement. The dream of green cities can take shape through green city, green schools and green buildings. They can shoulder the responsibility of planting the trees by sponsoring the planting and watering of the saplings planted under the program. They can donate machine for digging the pits through their Corporate Social Responsibility fund and create micro irrigation arrangement for providing water to the planted saplings. They make the chain link fencing facility to the farmers to avoid loss of agricultural produce. They can contribute to the ecotourism livelihood development program. He expressed confidence that the corporate sector and the Government can come together and perform fantastic jobs in the forest sector .
Forest Department will be the guide for our future journey
The dignitaries present for the function recorded that the forest department is planting trees with the aim and perseverance of creating a  Green Maharashtra and gave a hip hip hurrah for the their work in the sector. He expressed confidence that all the corporate entities will actively participate in the forest department mission to plant thirty three thousand crore plants during the ensuing monsoon season in Maharashtra. They also expressed the feeling that the state has attained the first position in non forest plantation in the country due to the consistent and focussed efforts of the Forest Department .
The forest department made a detailed presentation of the thrity three crores trees plantation mission before the present dignitaries.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा