प्रा. म. सु. पाटील यांच्या निधनाने व्यासंगी काव्य समीक्षक आणि वैचारिक लेखक हरपला - विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : ज्येष्ठ काव्य समीक्षक, लेखक प्रा. म. सु. पाटील यांच्या निधनाने मराठी साहित्यातील मर्मग्राही समीक्षेचा वस्तुपाठ देणारे व्यासंगी काव्य समीक्षक आणि वैचारिक लेखक हरपले आहेत अशी शोकभावना मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

डॉ. म. सु. पाटील यांच्या सर्जन प्रेरणा, कवित्व शोध या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या काव्याचे आणि दलित कवितेचे सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या महान लेखकास श्रध्दांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा