'व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमातील संधी’ विषयावर 'जय महाराष्ट्र' मध्ये अनिल जाधव यांची उद्या मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अनिल जाधव यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. 'व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमातील संधीया विषयावर घेतलेली ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक 10 मे रोजी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यामागचा उद्देश, या संस्थेतील प्रवेश प्रक्रिया, परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रमांचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय शिष्यवृत्ती, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नव्याने येणाऱ्या तरूण-तरूणींना असलेल्या विविध संधी आदी विषयाची माहिती श्री. जाधव यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा