लोकराज्यचा पर्यटन विशेषांक प्रकाशित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 11 : लोकराज्य मे 2019 च्या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन पर्यटन सचिव विनिता वेद सिंगल यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. यावेळी संचालक (माहिती व वृत्त) सुरेश वांदिले, उपसंचालक (प्रकाशने) डॉ.संभाजी खराट, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.

या अंकात महाराष्ट्राला लाभलेल्या अमर्याद पर्यटन सौंदर्याचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे, समुद्रकिनारे, किल्ले, लेणी, वने, संग्रहालये, अभयारण्ये, राज्यातील सात आश्चर्ये या सर्व वैशिष्ट्यांच्या माहितीसह पर्यटन स्थळांना कसे जायचे याची माहिती या अंकात देण्यात आली आहे. सामजिक पर्यटन, म्युझियम पर्यटन, कृषी पर्यटन आदीविषयांच्या माहितीपूर्ण लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. विनिता वेद सिंगल या अंकाच्या अतिथी संपादक आहेत. अंकाची किंमत 10 रुपये असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा