जय महाराष्ट्र कार्यक्रमात उद्या डॉ. प्रविण शिनगारे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




 

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील संधीया विषयावर वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रविण शिनगारे  यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  शुक्रवार दिनांक 3 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


वैद्यकीय क्षेत्रातील  प्रवेशप्रक्रिया, महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश इच्छुकांसाठी किती जागा उपलब्ध आहेत, एमबीबीएस नंतर पदव्युत्तर शिक्षणाच्या दृष्टीने कुठली क्षेत्रे विद्यार्थ्यांसाठी खुली आहेत, वैद्यकीय क्षेत्रातील परदेशातील संधी  आदी  विषयांची माहिती श्री. शिनगारे यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा