सिमी संघटनेशी संबंधित प्रकरणाची १७ व १८ मे ला सुनावणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १० : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियमातील कलम ३(१) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ (सिमी) या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम १९६७ अन्वये केंद्र शासनाने बंदी घातली आहे. या संघटनेच्या विविध प्रकरणांची सुनावणी औरंगाबाद येथे दि. १७ व १८ मे रोजी होणार आहे.

सिमी संघटनेच्या संबंधित प्रकरणांची तपासणी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबाद येथील  कोर्टरुम क्र. ९ येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा