'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या डॉ.विनोद मोहीतकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि ६ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी' या विषयावर  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्या, मंगळवार दिनांक ७ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे कार्य आणि उद्देश, तंत्रशिक्षण मंडळाकडे असणारे अभ्यासक्रम, तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रिया व परीक्षांचे स्वरूप, कौशल्यप्राप्त विद्यार्थी  घडविण्यावर देण्यात येत असलेला भर, डिप्लोमा केल्यानंतर रोजगाराच्या व उच्च शिक्षणाच्या संधी आदींची माहिती डॉ. मोहीतकर यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा