दिलखुलास कार्यक्रमात उद्या 'व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमातील संधी’ या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  


मुंबई, दि 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात  राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक अनिल जाधव यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.'व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमातील संधीया विषयावर घेतलेली ही विशेष मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शुक्रवार दि. 3 मे, शनिवार दि. 4 आणि सोमवार दि. 6 मे 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
       

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यामागचा उद्देश, या संस्थेतील प्रवेश प्रक्रिया, परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रमांचा कालावधी, अभ्यासक्रमासाठीच्या शिष्यवृत्त्या, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नव्याने येणाऱ्या तरूण-तरूणींना असलेल्या विविध संधी आदी विषयांची  माहिती श्री.जाधव यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा