‘दिलखुलास’कार्यक्रमात उद्यापासून 'नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी'या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात 2 जूनला होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (यूपीएससी) पार्श्वभूमीवर 'नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी' या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. 15, गुरुवार दि. 16, शुक्रवार दि. 17 आणि शनिवार दि. 18 मे रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.    


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप, व्याप्ती आणि परीक्षेची  तयारी, पूर्व परीक्षेचे सरावतंत्र, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुदृढ कसे राखायचे, पूर्व परीक्षेनंतरची मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी कशी करावी, आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. देशमुख यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा