लोकसभा निवडणूक पहिला टप्पा : दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.१३ टक्के मतदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ११ :  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.१३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा ४३.९०%, रामटेक (अ.जा.) ४४.५०%, नागपूर ४१.२५%, भंडारा-गोंदिया ४९.०५%, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ५७%, चंद्रपूर ४६.३०% आणि यवतमाळ-वाशिम ४३.३५%.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा