‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य’ यावर उद्या ‘जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलास' मध्ये विशेष कार्यक्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र'दिलखुलास' कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्यया विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्या शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर 'दिलखुलास' कार्यक्रमात शनिवार दि. 13 व सोमवार दि.15 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंत्ती निमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, त्यांच्या विचारातून स्पष्ट होणारे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. आगलावे यांनी जय महाराष्ट्र'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदीका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा