‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर मार्गदर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  जय महाराष्ट्र  कार्यक्रमात  कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी  या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा.मीनल मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्या शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी एका प्रश्नाला किती वेळ द्यायला पाहिजे, पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी साधारण किती मार्कांची आवश्यकता असते, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीची तयारी कशी करावी, आदी विषयांची माहिती प्रा.मापुस्कर यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा