'दिलखुलास' मध्ये उद्या 'महाराष्ट्राची जडणघडण' या विषयावर विशेष कार्यक्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्राची जडणघडण' या विषयावर प्रा. हरी नरके यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. २६, शनिवार दि. २७ आणि सोमवार दि. २९ रोजी   सकाळी  .२५ ते .४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत कोणत्या प्रश्नांवर जास्त काम होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राला प्रगत राज्य म्हणताना कोणत्या प्रश्नांची सोडवणूक करणे अपेक्षित आहे. राज्याच्या विकासात मुलभूत गरजांवर झालेल्या कामांबाबत आणखी पुढे काय करता येईल, या विषयांवर प्रा. नरके यांनी  दिलखुलास मधून माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा