‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पाण्यासाठी श्रमदान’ विषयावर उद्या मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'पाण्यासाठी श्रमदान' या विषयावर पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ व मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ यांची मुलाखत  घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होईल. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ही मुलाखत बुधवार दिनांक 10 गुरूवार दि. 11 आणि शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्याचा उद्देश व रचना, प्रशिक्षण व श्रमदानाचे महत्त्व, अनेक सिनेकलावंत, स्वयंसेवी संस्था, शासकीय कर्मचारी यांचा मोहिमेमध्ये असलेला सहभाग, महा श्रमदान महोत्सव, यावर्षी पानी फाउंडेशनने सुरू केलेले नवीन उपक्रम, पानी फाउंडेशनचे काम सातत्यपूर्ण पुढे देखील असेच चालू राहावे यासाठी आखलेली योजना, आदी विषयी माहिती श्री. भटकळ आणि डॉ. पोळ यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा