राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नवी दिल्ली, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 128 वी जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी डॉ.आंबडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदनातील पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजीत नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे आणि जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ.आंबडेकर यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

महामानवाला अभिवादनविशेषांक प्रदर्शनाला उतम प्रतिसाद

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने कस्तुरबा गांधी मार्ग येथे त्यांच्या जीवनकार्यावरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासनामार्फत प्रकाशित महामानव या विशेषकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. निवासी आयुक्त श्री. सहाय यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावरील विशेषकांतील आशय, मांडणी उत्तम व उपयुक्त असल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा