‘निवडणुकांमधील सोशल मीडियाचा वापर’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ चा उद्या विशेष कार्यक्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र  दिलखुलास कार्यक्रमात निवडणुकांमध्ये होणारा सोशल मीडियाचा वापर या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

या मुलाखतीमध्ये अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,  महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे  संचालक (माहिती) (प्रशासन) अजय अंबेकर यांचा सहभाग आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि.१९ , शनिवार दि. २० आणि सोमवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूका होण्यासाठी  तसेच  निवडणूक  प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा होणारा वापर, निवडणुकीतील सोशल मीडियाची आव्हाने, सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक पातळीवर करण्यात येत असलेल्या टिकेवर आळा घालण्यासाठी  निवडणूक आयोगाची तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची असलेली भूमिका, सोशल मीडियासंदर्भातील तक्रारींसाठी कोठे संपर्क साधावा आदी विषयांची सविस्तर माहिती जय महाराष्ट्र दिलखुलास कार्यक्रमातून  दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा