छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी सभापतींचे सचिव महेंद्र काज, तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा