‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘स्टाफ सिलेक्शन परीक्षेची तयारी’ या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि.5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात स्टाफ सिलेक्शन परीक्षेची तयारीया विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा. आनंद मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शनिवार दि.6, सोमवार दि.8  आणि मंगळवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


स्टाफ सिलेक्शनच्या पेपरचे स्वरूप, बँकिंग परीक्षेची तयारी, परीक्षांची जाहिरात कोठे पाहायला मिळते, एसएसबी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांद्वारे भरली जाणारी पदे, स्टाफ सिलेक्शनद्वारे भरली जाणारी पदे आदी विषयांची माहिती श्री. मापुस्कर यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा