मॅराथॉनच्या माध्यमातून एकतेचा संदेश जागतिक स्तरावर -राज्यपाल चे. विद्यासागर राव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 : मॅराथॉन स्पर्धेमध्ये देश-विदेशातील धावपट्टू सहभागी होतात. यामुळे एकतेचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचतो, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने टाटा मुंबई मॅराथॉन 2019 साठी निधी उभारणाऱ्या संस्थांचा ऑपेरा हाऊस येथे पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने मॅराथॉनच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला असून यामुळे एकतेच्या भावनेला प्रेरणा मिळते, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते निधी उभारणाऱ्या विविध संस्थाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, टाटा कन्सलटन्सीचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री तारा शर्मा तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ एप्रिलचा अंक प्रकाशित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 30 : आपलं मंत्रालय एप्रिलच्या अंकाचे प्रकाशन महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. श्री.खारगे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.

यावेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, संपादक तथा संचालक (वृत्त) सुरेश वांदिले, उपसंचालक डॉ. संभाजी खराट, विभागीय संपर्क अधिकारी डॉ.सुरेखा मुळे, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.या अंकात निवडणुकीचे कामकाज करताना अधिकारी कर्मचारी यांना आलेल्या अनुभवाचे कथन, तसेच हा खेळ चिन्हांचा, कर्तव्याचा आनंद, निवडणुकीची डिजीटल कथा आदी लेख, व्यंगचित्रे, कविता, मंत्रालय परिसरातील घडामोडींचा यात समावेश करण्यात आला आहे.

मुख्य सचिव युपीएस मदान यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि.29 : राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान यांनी पत्नीसह ओल्ड क्लब हाऊस, भक्तीपार्क, वडाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान - मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


चार टप्प्यात एकूण सरासरी . टक्के मतदान

मुंबई, दि. 29 :  महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. अशा रितीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण झाला. आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 17 लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे 57 टक्के इतके मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

सन 2014 च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहिले असल्याचे श्री.अश्वनी कुमार यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते.श्री.कुमार म्हणाले, पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजी मतदानाची टक्केवारी अशी नंदुरबार - 67.64 टक्के, धुळे - 57.29 टक्के, दिंडोरी  64.24 टक्के, नाशिक -55.41 टक्के, पालघर - 64.09 टक्के, भिवंडी  53.68 टक्के, कल्याण  44.27 टक्के, ठाणे  49.95 टक्के, मुंबई उत्तर  59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम  54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य - 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य  55.35 टक्के, मुंबई दक्षिण  52.15 टक्के, मावळ  59.12 टक्के, शिरुर -59.55 टक्के आणि शिर्डी  66.42 टक्के.

चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळेस ११६५ बीयू तर ७३२ सीयू आणि २ हजार ४६७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. आतापर्यंत सी व्हीजील ॲपवर ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री.अश्वनी कुमार म्हणाले की, सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वीप (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा चांगला परिणाम झाला.

महाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना श्री.कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 71.98 टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे 7 लाख 49 हजार 374 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 1 लाख 4 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या  निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.

यावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्याकरिता एकूण 1 लाख 85 हजार 850 (बीयू), 1 लाख 17 हजार 139 (सीयू) आणि 1 लाख 23 हजार 206 व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.

आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये ५३ कोटी आठ लाख रोख रक्कम, ७० कोटी १२ लाख किमतीचे सोने, ३४ कोटी १५ लाख रकमेचे मद्य व मादक पदार्थ असे एकूण १५७ कोटी ५४ लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात १७ हजार ५८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मतदानाची टक्केवारी :-

Phase
No. of PCs
Total Electors
Total Voters
% Voters
2019
% Voters
2014
I
07
1,30,35,335
82,17,609
63.04
63.85
II
10
1,85,46,472
1,16,61,830
62.88
62.43
III
14
2,57,89,945
1,60,81,856
62.36
62.88
IV
17
3,11,93,795
1,77,79,909
अंदाजे 57.00
55.59
Total
48
8,85,65,547
5,37,41,204
अंदाजे 60.68
60.32
००००००
विसंअ अजय जाधव / इर्शाद बागवान / दि. २९.०४.२०१९


मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.२९ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार यांनी आज सकाळी आपले कुटुंबिय पत्नी, मुलगा व मुलीसोबत रॉकी हिल येथील बालकल्याणी स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.

श्री.कुमार यांनी रांगेतील मतदारांशी चर्चा करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

या ठिकाणी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार यांनी कुटुंबासह, कोकण विभागाचे राज्य माहिती आयुक्त सुनिल पोरवाल, उपलोकायुक्त शैलेश शर्मा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनीही बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्नीसह चर्चगेट येथील के.सी. कॉलेजच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी श्री.शिंदे यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. तेथील केंद्र प्रमुख व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कुटुंबासह, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे राज्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. सतीश पवार यांनी पत्नी आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी के.सी. कॉलेजच्या मतदान केंद्रावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला.


कोकण विभागाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी मुलासोबत रिगल सिनेमाजवळील सेंट ॲनिस गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

मतदानासाठी मतदार चिठ्ठीसोबत ओळखपत्र आवश्यक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.27: लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार दि. 29 एप्रिल 2019 रोजी शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. मतदाराला निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (Epic) अथवा 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. मतदारांच्या सोयीसाठी देण्यात आलेली मतदार चिठ्ठी ही मतदाराचे नाव, मतदान केंद्र याच्या माहितीसाठी आहे. केवळ ही मतदार चिठ्ठी मतदानासाठी पुरेशी नाही. मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र अथवा 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

ऑनलाईन मतदार पावतीमुळे मतदान केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आणि यादी भाग क्रमांक आदीबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. nvsp.in या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदान केंद्र, क्रमांक, स्थळ इत्यादी तपशील पाहता येईल. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11 ओळखपत्रे

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशावेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचे शिष्टमंडळ मुंबईमधील मतदान केंद्रांना भेट देऊन जाणून घेणार निवडणूक प्रक्रिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


लोकसभा निवडणूक-2019

मुंबई, दि. 27 : ऑस्ट्रेलिया व कॅनडा देशांच्या उच्चायुक्त कार्यालयाचे शिष्टमंडळ दि. 29 एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहे. मतदान व निवडणूक प्रक्रिया जाणन घेण्यासाठी हा दौरा असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशातील निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे. सध्या भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. मुंबईमधील निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया व कॅनडाचे शिष्टमंडळ काही मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत.

महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान दि. 29 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. मतदान कालावधीत दोन्ही देशांची शिष्टमंडळे मुंबईमधील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान व त्याच्या प्रक्रियेची पाहणी करणार आहेत. मतदान कसे चालते?, मतदारांच्या रांगा, पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रातील कर्मचारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि मतदान केंद्रावरील सुविधांची माहितीही शिष्टमंडळ जाणून घेणार आहे. याशिवाय सर्व महिला कर्मचारी असलेल्या सखी मतदान केंद्रालाते भेट देऊन माहिती घेणार आहेत.

महाराष्ट्र दिन शासकीय सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 27 : महाराष्ट्र दिनी साजऱ्या होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्याची आज शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी लोहमार्ग पोलीस दल, वाहतूक पोलीस दल, महापालिका सुरक्षा दल, ब्रास बँड पथक, सशस्त्र पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलीस दल आदी दलांनी संचलनाची रंगीत तालीम केली. यावेळी अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सादरीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली.


२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल, मुंबई अग्निशमन दल व बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल (महिला) या शासकीय सेवेतील पथकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. शालेय पथकांमध्ये भारत स्काउट आणि गाईडस् (मुली) यांनी प्रथम तर आरएसपी (मुली), रुस्तमजी इंटरनॅशनल हायस्कूल, दहिसर यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

संगीतामुळे मानसिक आरोग्य सुदृढ - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतएनसीपीए येथील संगीत कार्यक्रमास उपराष्ट्रपतींची उपस्थिती

मुंबई, दि. २६ : धावपळीच्या युगामध्ये मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य समतोल राहत नाही. दररोज संगीत ऐकल्याने मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळते, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

एनसीपीए येथे साऊथ एशियन सिम्फनी ऑर्केस्ट्रा यांच्यावतीने संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


साऊथ एशियन सिम्फनी ऑर्केस्ट्रा मध्ये विविध देशाचे संगीत कलाकार असल्यामुळे या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाचा संदेश विश्वामध्ये गेला आहे. तसेच संगीताच्या माध्यमातून विविध देशातील मैत्रीचे संबंध दृढ होण्यास मदत मिळते, असेही उपराष्ट्रपती श्री.नायडू यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, साऊथ एशियन सिम्फनी ऑर्केस्ट्राचे सुधाकर राव, निरुपमा राव तसेच विविध देशातील संगीत श्रोते उपस्थित होते.

'दिलखुलास' मध्ये 'तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी' यावर संचालक डॉ.विनोद मोहीतकर यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात 'तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी' या विषयावर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर' यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार  दि. ३०, बुधवार  दि. १ आणि सोमवार दि. २ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे कार्य आणि उद्देश, तंत्रशिक्षण मंडळाकडे असणारे अभ्यासक्रम, तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रिया व परीक्षांचे स्वरूप, कौशल्यप्राप्त विद्यार्थी घडविण्यावर देण्यात येत असलेला भर, डिप्लोमा केल्यानंतर रोजगाराच्या व उच्च शिक्षणाच्या संधी आदी विषयांची माहिती डॉ. मोहितकर यांनी दिली आहे.