‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम’ पुरस्काराने महाराष्ट्रातील ५ अधिकारी सन्मानित

1 टिप्पणी



नवी दिल्ली : ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या प्रतिष्ठित पुरस्काराने महाराष्ट्रातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.

येथील प्रवासी भारतीय केंद्रात 'कल्पकता आणि प्रशासन' या विषयावर दीनदयाल संशोधन संस्था आणि युनायटेड नेशन ग्लोबल काम्पेक्टच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केली. यावेळी देशभरातील विविध विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग बोर्डाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त राजीव जलोटा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर या पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशासनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. अब्दुल कलाम या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1 टिप्पणी