नागपूर येथील विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
आगामी काळात नागपूर ठरेल व्हायब्रंट  शहर - मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसनागपूर, दि.4 : वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने दिलेल्या अहवालानुसार 2035 साली नागपूर जगातील पहिल्या दहा शहरांपैकी  मोस्ट व्हायब्रंट शहर असेल याचा दाखला देत नागपूर शहराच्या विकासासाठी शासन  पाठीशी राहिल, असे आश्वस्त उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
         


नागपूरची प्रगती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जागतिक शहर म्हणून नागपूर उदयास येत आहे. हे शहर रोजगाराचे केंद्र होत आहे. 2035 या वर्षापर्यंत या शहराचे  सकल उत्पन्न चौपट होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वंजारीनगर ते अजनी रेल्वे मेन्स शाळा या उड्डाणपूलासह  विविध विकासकामांच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्‍ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे व महापौर नंदा जिचकारउपमहापौर दिपराज पार्डीकर, लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल  उपस्थित होते.प्रास्ताविक आमदार सुधाकर कोहळे यांनी केले. दक्षिण नागपूरातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. विकास कामांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल आभार व्यक्त केले.

नागपूर जिल्ह्यात साधारणत: 66 हजार कोटी रूपयांची विकासकामे सुरु असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात व शहरात सुरु असलेल्या व प्रस्तावित असलेल्या कामांची निधीसह सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या भाषणात दिली. नागपूरला स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्लान तयार करण्याची सूचना त्यांनी दिली.

यावेळी  एकूण 108 कोटी रूपयांच्या विकासकामांचे ई भूमीपूजन झाले. या कामामंध्ये एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत 57 कोटीचे 33 के.व्ही.उपकेंद्र  व वीजवाहिनी, पंडीत दिनदयाळ ई ग्रंथालय, महानगरपालिकेअंतर्गत सिंमेट रस्ते यासह विविध विकासकामांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा