साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 7 : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचे, कोणाला नाही, याचा संपूर्ण निर्णय हा संमेलनाच्या आयोजकांचा असून यामध्ये राज्य शासनाचा संबंध नसल्याचे मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्यावरुन वाद सध्या सुरु आहेत. यासंदर्भात कालपासून विविध माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा येत आहे. यासंदर्भात राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठी भाषा विकास मंत्री यांनी आज पत्रकार परिषद घेतली.


या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. तावडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये राज्य शासन हस्तक्षेप करीत नाही. संमेलनाचे संपूर्ण वेळापत्रक हे आयोजक ठरवित असतात त्यामुळे जेथे राज्य शासनाचा संबंध नाही तेथे उगाचच राज्य शासनावर आरोप करण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा