'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्र्यांचा 'लोकसंवाद'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पहिल्या 'लोकसंवाद' कार्यक्रमातून राज्यातील लाभार्थ्यांशी नुकताच संवाद साधला. 'लोकसंवाद' या कार्यक्रमाचा पहिला भाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' मध्ये दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दि. 4 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे.      
  

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर लाभार्थ्यांना मिळालेला योजनांचा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी व आवश्यक सुधारणांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  2 जानेवारी रोजी पहिल्या 'लोकसंवाद' कार्यक्रमाद्वारे जाणून घेतली. सन 2022 मध्ये प्रत्येक बेघर कुटुंबाकडे आपला हक्काचा निवारा असावा, असा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  याच अनुषंगाने  प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शौचालयाचे बांधकाम अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून जाणून घेतली.  मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून प्रसारण होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा