अमृत सकस आहारामुळे मी व माझे लेकरु सुदृढ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

जन्माला येणार लेकरु गुडगुडीत असावे, सदृढ असावे, यासाठी लेकराची सर्वच काळजी घेतात पण त्या लेकराला जन्म देणाऱ्या मातेकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नाही, ती दुर्लक्षीत रहाते, कारणही तसेच आहे, गरीबी, घरात खाणारे जास्त कमविणारा एकटा पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज कमवून आणलेल्या चार पैशांतून घर चालवून गरोदर मातेला सकस आहार तर देवू शकेल का ? परंतू याला अपवाद ठरली, धामडोद गावातील अंगणवाडी ? या अंगणवाडीतून अनेक कुपोषित गरोदर व स्तनदा मातांना नियमित अमृत आहार देवून स्तदामाता, गरोदार मातांची काळजी घेवून अंगणवाड्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेला पर्यवेक्षिका, अगंणवाडी शिक्षीका व सेवीका यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेला चालना दिली आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या श्रीमती मंगला भिल यांची यशोगाथा

नंदुरबार तालुक्यातील धामडोद या आदिवासी गावांत राहणारी श्रीमती मंगला लव्हा भिल या 23 वर्षाची स्तनदा माता अंगणवाडीत आपल्या लेकरुसह अमृत आहारासाठी आली असता तिला बोलती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंगला भिल म्हणाली, मी तीन महिन्याची गरोदर असताना अंगणवाडीमध्ये नांव नोंदणी करुन लसीकरणासाठी आली. यावेळी माझी प्रकृती खराब हाती. माझे वजनही खूप कमी झाले होते, अंगणवाडीच्या ताईन विचारपूस करुन तु वेळेवर जेवन करत नाही, का? यावेळी अगणवाडीच्या ताईला घरची सर्व परिस्थितीची कल्पना दिली. अंगणवाडी ताईने सांगितले की, तु उद्या पासून अंगणवाडीत एक वेळेच्या जेवणासाठी नियमित ये. शासनाने अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु केली असून या योजनेचा तुला लाभ घेता येईल. मला तर मनातल्या मनात खूपच आनंद झाला. कारण एक वेळचा सकस चौरस आहार शासनाकडून फुकटमध्ये दररोज मिळणार, मी पहिल्या दिवशी अंगणवाडीत जावून आहाराचा स्वाद घेतला. त्यात चपाती, भात, कडधान्ये, दाळ, अंडे, चिक्की, हिरवी भाजी, खाण्यास पोटभर मिळाल्याने मला बरे वाटले, मी उद्याचा विचार करायला लागले कारण हा चौरस सकस आहार बाळाचा जन्म ते बाळ सहा महिन्याचा होईपर्यंत मला मिळणार होता. मनातल्या मनात विचार करत होते. या आहारामुळे व नियमित तपासणीमुळे माझे येणारे बाळ हे गुडगुटीत व सदृढ असेल, या आहराचे नियमित सेवन केल्यामुळे काही दिवसाने माझ्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली, व हिमोग्लोबीनातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

अंगणवाडीत मिळणाऱ्या रोजच्या सकस चैारस आहारात दररोज वेगवेगळे पदार्थ मिळतात त्यामुळ माझ्या प्रकृतीत व पोटात असलेल्या बाळाच्या प्रकृतीत दिवेंदिवस सुधारणा होत असल्याचे माझ्या वाढलेल्या वजनावरुन नियमित तपासणीत डॉक्टरांनी सांगितले याचा मला मनस्वी आनंद होत होता.

मंगला भिल पुढे म्हणाल्या की, माझ बाळ आज तीन महिन्याचे झाले असून ते गुळगुळीत व सदृढ आहे. अजून तीन महिने मला या अंगणवाडीत डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम अमृत आहाराचे मला दररोज सेवन करता येईल. या सकस आहारामुळे माझे व माझ्या बाळाचे जीवनच बदलून गेले आहे. आमच्या सारख्या गरीबांना एवढा चांगला सकस चौरस अमृत आहार मिळाला न होता कधी कधी तर काम करुनही अर्ध उपाशी पोटी आम्ही जगत होता. परंतु शासनाने आमच्या सारख्या गरीब अनेक लोकांसाठी डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम अमृत आहार योजना काढून माझ्या सारख्या अनेक गरोदर स्तनदा मातांना नवीन जीवन दिले आहे. आमच्याकडे शासनाच उपकार मानण्यासाठी शब्द नाहीत, असेही मंगला भिल म्हणाली. या अमृत आहारामुळे अनेक गरीब कुटूंबातील गरोदर माता, स्तनदांमातांचे जीवन जगणे सुखदायी झाले आहे.

शब्दांकन :-
जगन्नाथ पाटील,
प्र. जिल्हा महिती अधिकारी

नंदुरबार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा