साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाचे निवेदन....


मुंबई, दि. 7: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते.

तथापि यवतमाळ येथे आयोजित अ. भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरुन वाद उभे केले जात आहेत. यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न सुद्धा काही माध्यमे हेतूपुरस्सर करीत आहेत. अ.भा. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मा. मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो.


साहित्य संमेलनांमधून सरकारांवर/समाजातील निरनिराळ्या विषयांवर मते नेहमीच व्यक्त केली जात असतात. त्या मतांकडे-मंथनाकडे सरकारसुध्दा सकारात्मकपणेच पाहत असते. त्यामुळे अकारण ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करु नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा