अपंग समावेशित विशेष शिक्षकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नागपूर, दि. 4 : अपंग समावेशित विशेष शिक्षकांचा सामान्य  शिक्षकपदी समायोजनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल अपंग समावेशित विशेष शिक्षक कृती समितीच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानन्यात आले.

अपंग समावेशित विशेष शिक्षक कृती समितीच्या वतीने गेल्या 68 दिवसांपासून संविधान चौकात धरणे आंदोलन सुरु होते, यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

अपंग समावेशित विशेष शिक्षक त्यांचे थकित वेतन तसेच त्यांचा सामान्य शिक्षकपदी समायोजनाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समितीच्या वतीने निवेदन दिले. विशेष शिक्षकांना अतिरिक्त घोषित करुन त्यांचे समायोजन करण्याबाबत  निश्चितच कार्यवाही करण्यात येईल, असे  आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी समितीच्या सदस्यांना दिले.


यावेळी निवेदन देताना विशेष शिक्षक युवराज चोरे, श्रीवंत शेंडे, बंडू कुबडे, प्रशांत गोस्वामी, प्रशांत मेंढे, पंकज कडू, प्रवीण वानकर, नितेश पिकले आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा