'जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास'मध्ये उद्या क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र'  'दिलखुलास' कार्यक्रमात खेलो इंडिया या विषयावर शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास व वक्फ  मंत्री विनोद तावडे, कबड्डीपट्टू सायली जाधव, अभिलाषा म्हात्रे व रोईंगपटू दत्तू भोकनळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 8 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. 8 व बुधवार दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.


खेलो इंडियाचे यजमानपद  प्रथमच महाराष्ट्राला मिळाले आहे. केंद्र व राज्य सरकार यांचा स्पर्धेतील सहभाग, स्पर्धेत कोणत्या खेळांचा समावेश आहे, खेलो इंडिया युथ गेम्सची वैशिष्ट्ये, स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाने केलेले नियोजन याबाबतची माहिती श्री.तावडे यांनी 'जय महाराष्ट्र' दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. या कार्यक्रमात खेळाडूंचा सुद्धा सहभाग असून त्यांनी राज्‍यातील उदयोन्‍मुख खेळाडूंना त्‍यांचे क्रीडा कौशल्‍य वाढविण्‍यासाठी शासनाकडून कशा प्रकारे मदत झाली पाहिजे याविषयी मत मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा