ज्येष्ठ माजी सैनिकांनी अनुदानासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई दि. 3 : वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले तसेच अन्य ठिकाणी उत्पादक कार्य करत असलेल्या ज्येष्ठ माजी सैनिक/विधवा यांना अनुदान सुरु करण्याची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे. त्यासाठी पात्रताधारक लाभार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांनी केले आहे


मुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील पात्रताधारक लाभार्थी असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा 022- 22700404 येथे संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा