हज यात्रेकरुंच्या सुरक्षेला प्राधान्य - अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
हज यात्रेसाठी इच्छुक यात्रेकरूंच्या निवडीसाठी सोडत

मुंबई, दि. 7 : देशात उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक यात्रेकरु हज यात्रेसाठी जातात. या यात्रेकरुंच्या सुरक्षेला राज्य शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी केले. आज सकाळी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसलगत असलेल्या हज हाऊस येथे हज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरी (कुरी) सोडत कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, महाराष्ट्र राज्य हज समितीचे गफर मगदूम, अधिकारी इम्तियाज काझी आदी यावेळी उपस्थित होते.श्री. तावडे म्हणाले, हज 2019 साठी महाराष्ट्रातून एकूण 35 हजार 666 इतक्या अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. हज 2019 करिता महाराष्ट्राला एकूण 11 हजार 907 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यापैकी 70 वर्षांहून अधिक वय असलेले (राखीव अ प्रवर्ग) आणि महिला राखीव प्रवर्ग (मेहरम शिवाय जाणाऱ्या स्त्रिया) असे 2 हजार 285 जागा वगळता एकूण 9 हजार 622 हज यात्रेकरुंकरिता लॉटरी (कुरी) काढण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा