‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या आणि परवा नरेंद्र पाटील यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. 10 आणि शुक्रवार दि. 11 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक  शिल्पा नातू यांनी ही मुलाखत घेतली आहे.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना, महामंडळाच्या योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या पात्रता, अटी व शर्ती, महामंडळाशी संपर्क साधायचा असल्यास दूरध्वनी क्रमांक व वेबसाईट आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा