उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग-इंडियन मर्चंट चेंबर यांच्यामध्ये सामंजस्य करार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 2 : महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विकास साधण्यासोबत गुंतवणूक वाढवण्यासाठी एकत्रित काम करण्यासाठी आज उद्योग विभाग व इंडियन मर्चंट चेंबर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.


यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, उपसचिव संजय इंगळे यांच्यासह इंडियन मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष राज नायर, उपाध्यक्ष आशिष वैद्य, राजीव पोदार, मनोज पाटोदिया, दिनेश जोशी, नितीन भापकर आदी उपस्थित होते.


करारातील काही ठळक मुद्दे
उद्योगांसाठी आखलेल्या धोरणांची परस्परांना वेळोवेळी देवाण-घेवाण करणे व त्या धोरणांची अमंलबजावणीसाठी  प्रयत्न करणे.


राज्यातील औद्योगिक क्षेत्रात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यावर भर देणे.


उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी राज्य सरकार, उद्योग विभाग व आयएमसीने एकत्रित काम करणे. उद्योगापुढील समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यावर मार्ग काढणे..


लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी धोरण ठरविणे, नवीन संधी, धोरणे यांची माहिती शेअरधारक आणि गुंतवणूकदार वेळोवेळी पुरविणे.

प्रत्येक महिन्याला दोन्ही विभागाची बैठक घेणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा