खासदार विनायक राऊत यांची महाराष्‍ट्र परिचय केंद्रास भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
                                                                
नवी दिल्ली, दि. 7 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी आज महराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.राऊत यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.


श्री.राऊत यांनी यावेळी, परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिद्धी आणि कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री.कांबळे यांनी माहिती दिली. दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आदींची माहिती श्री.कांबळे यांनी यावेळी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री.राऊत यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा