एमटीडीसीच्या रिसॉर्टस् मध्ये ज्येष्ठ नागरिकांना २० टक्के सवलत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) राज्यातील पर्यटक निवासात (रिसॉर्टस्) सोमवार ते शुक्रवार या दिवशी ज्येष्ठ नागरिकांना विशेष 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी ही माहिती दिली.

महामंडळाची पर्यटक निवासे ही निसर्गरम्य ठिकाणी आहेत. राज्यात गणपतीपुळे, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, तारकर्ली, ताडोबा, वेलणेश्वर, अजंठा, भंडारदरा, चिखलदरा, पानशेत, शिर्डी, कार्ला आदी ठिकाणी अशी 23 पर्यटक निवासे आहेत. ज्येष्ठ नागरिकांची निवासाबाबत महामंडळाच्या व्यवस्थापकामार्फत विशेष काळजी घेतली जाईल. तसेच या संदर्भात आरक्षणाची सेवा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जेणेकरुन तत्परतेने ज्येष्ठ नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. दरम्यान, महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा