पुणे मनपा वर्ग-४ च्या सेवकांना धुलाई भत्ता लागू करण्याबाबत शासन सकारात्मक - राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 8 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत कीटक प्रतिबंधक विभाग आणि व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-4 च्या सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्यासाठी तसेच लाड पागे समितीने शिफारस केलेल्या काही शिफारसी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आयोजित बैठकीत सांगितले.


पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत कीटक-प्रतिबंधक विभाग आणि व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-4 मधील सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत मंत्रालयीन दालनात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी पुणे महानगरपालिका, नगरविकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. लाड पागे समितीच्या काही शिफारशी या वर्गाला लागू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याबाबतचे निर्देश डॉ. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा