‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या, परवा प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात पद्मभूषण पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. 3 आणि शुक्रवार दि. 4 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.


श्री. सुतार यांना शिल्पकलेतील मोलाच्या योगदानासाठी २०१६ सालचा प्रतिष्ठेचा टागोर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार  जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या त्यांच्या भावना, जगातील सर्वात उंच असा नावलौकिक असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शिल्प उभारणीत दिलेले योगदान, शिल्पकलेकडे नेमके कसे वळले, शिल्पकलेच्या माध्यमातून संसद परिसरात उभारलेले पुतळे, शिल्पकलेची आवड असणाऱ्या व शिल्पकलेत करिअर करून इच्छिणाऱ्यांसाठी दिलेला संदेश आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. सुतार यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा