केंद्रीय गृह मंत्रालयाच्या @CyberDost या ट्विटर हँडलवरुन सायबर गुन्ह्यांसंदर्भात जनजागृती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

नागरिकांनी माहिती घेण्याचे गृह मंत्रालयाचे आवाहन
मुंबई, दि. 3 : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. नागरिकांमध्ये याविषयी पुरेशी जनजागृती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर समाजामध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे. बँकेचा युजर आयडी, एटीएम/डेबिट कार्डचा क्रमांक व पि, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.


सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे. त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याबद्दलची माहिती देण्यासाठी गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवश्यक ती माहिती मिळत असून त्यातून नागरिकांच्या माहितीत भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे या ट्विटर हँडलला भेट द्यावी व त्याला फॉलो करावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा