पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 27 : कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.


श्री. सहारिया यांनी सांगितले की, 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी : राजापूर (जि.रत्नागिरी)- 6, आळंदी(पुणे)- 9, फलटण (सातारा)- 12, दुधनी (सोलापूर)- 2, पन्हाळा (कोल्हापूर)- 8, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल(जळगाव)- 1, बीड- 11, बुलढाणा- 12, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा