डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटाचे उद्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन गुरुवार दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच हा चित्रपट निवासी मंडप, शिवाजी पार्क, दादर (प) येथे स्क्रीनवर दिवसभर दाखविण्यात येणार आहे.


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले असून या चित्रपटाची निर्मिती राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा