प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : गोरेगाव येथे ४१ व्या प्रबोधन क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. वांद्रे-दहिसर या क्षेत्रातील 200 शाळेतील सुमारे सात हजार विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत.


स्पर्धेची सुरुवात खेळाडूंच्या संचलनाने झाली. कबड्डी, धनुर्विद्या, मल्लखांब, बुद्धिबळ, अथलेटिक्स, स्वीमिंग आदी क्रीडा प्रकार या स्पर्धेत होणार आहेत. चार दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. मुलांनी क्रीडा गुण दाखवून ही स्पर्धा यशस्वी करावी, असे श्री. देसाई यांनी सांगितले तसेच या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा