थायलंडच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतली विनोद तावडे यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि .1 : थायलंडचे शिक्षणमंत्री डॉ. टेराकिएट जेरेनासेटासिन आणि वाणिज्यदूत श्री.एकापोल पूलपीपट यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकार आणि थायलंड यांच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील परस्परांच्या सहकार्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली.दोन्ही देशामंध्ये शिक्षण क्षेत्रात अधिक भक्कम काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल श्री. तावडे यांनी थायलंडच्या शिक्षणमंत्र्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध यांचे विचार पाली या भाषेत असून महाराष्ट्रामध्ये पाली भाषा अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने थायलंड सरकारने सकारात्मक सहकार्य करावे, असे श्री. तावडे यांनी सांगितले. थायलंड देशामध्ये सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाचे प्रमाण वाढले आहे. पर्यटकांच्या दृष्टीनेही थायलंड देशाला अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बॉलिवूडमधील निर्माते व दिग्दर्शक आणि थायलंड सरकार यांच्यामध्ये सकारात्मक योजना राबविण्याबाबत नक्कीच विचार करण्यात येईल, असे श्री. तावडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा