महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 6 : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.


याप्रसंगी विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले, श्रीमती मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, नागनाथ थिटे, ऋतुराज कुडतरकर, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, मुख्य सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील, अवर सचिव रवींद्र जगदाळे, अवर सचिव (समिती) सुनील झोरे, आनंद रहाटे आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा