फ्रॉस्ट अँड सॅलिव्हन कंपनीच्यावतीने दिला जाणारा यंदाचा 'इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स ॲवार्ड' महाराष्ट्राला जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
२९ राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ठरले अव्वल

मुंबई, दि. ६ : मार्केट रिसर्चसाठी जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेल्या फ्रॉस्ट अँड सॅलिव्हन कंपनीच्यावतीने दिला जाणार इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स ॲवॉर्ड यंदा महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. फ्रॉस्ट अँड सॅलिव्हन कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मॅन्युफॅक्चरिंग काँपिटेटीवइंडेक्समध्ये म्हणजे उत्पादन करण्यासाठी उपयुक्ततेच्या मानांकनात महाराष्ट्राने देशात प्रथम स्थान मिळवले आहे. फ्रॉस्ट अँड सॅलिव्हन कंपनीच्या १५ व्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य शासनाच्या वतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

फ्रॉस्ट अँड सॅलिव्हन कंपनीतर्फे (ग्रोथ) विकास (इनोव्हेशन), नाविन्यता आणि (लीडरशीप) अग्रेसरता या तीन घटकांची पाहणी करण्यात आली. याशिवाय आर्थिक स्थिती आणि उत्पादकता, मनुष्यबळ आणि रोजगार क्षमता, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन, प्रशासकीय सुलभता, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीची उपलब्धता आदी घटकांचा अभ्यास करण्यात आला.  देशातील २९ राज्यांसाठी ही पाहणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

फ्रॉस्ट अँड सॅलिव्हन कंपनी गेल्या पंधरा वर्षांपासून देशातील उत्कृष्ट १०० उत्पादन संस्थेचा विविध स्तरावर अभ्यास करते. त्यात मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे आढळून आले आहे. यावर्षी केलेल्या पाहणीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकवल्याचे आज कंपनीच्या पुरस्कार सोहळ्यात जाहीर करण्यात आले.या सोहळ्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते वेबको इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक पी. कनीप्पन, युपीएल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.आर.श्रीवास्तव तसेच हिंदूस्थान लिव्हरच्या सप्लाय चेनचे संचालक प्रदीप बॅनर्जी यांना लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवार्ड देण्यात आला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या इगतपुरीच्या युनिटसाठी स्मार्ट फॅक्टर ॲवार्ड देण्यात आला. मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा