राजधानीत महाराष्ट्रातील पाच कलाकारांचे ‘युटोपियन’ चित्रप्रदर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली, दि. 28 :  नागपूर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापक व चित्रकारांनी एकत्र येत देशाच्या राजधानीत युटोपियनहे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे.येथील मंडी हाऊस भागातील रविंद्रभवन कला दालनात सुरु असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ललित कला अकादमीचे सचिव राजन फुलारी  यांच्या हस्ते  झाले. हे प्रदर्शन दि. 2 जानेवारी 2019  पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.
प्रदर्शनात 72 चित्रांचा समावेश
या प्रदर्शनात पाच चित्रकारांची  एकूण 72 चित्र मांडण्यात आली आहेत. यातील तीन चित्रकारांनी अमूर्त चित्रकला प्रकारात तर दोन चित्रकारांनी मानवी आकारांचा वापर करून चित्र सादर केली आहेत. मानवी आकारांच्या माध्यमातून दैनंदिन मानवी जीवनाचे चित्र मांडणारी सुभाष बाभुळकर यांची 30 व अब्दुल गफ्फार यांची 12 अशी एकूण 42 चित्र या ठिकाणी आहेत. निसर्गातील रंग व आकार यांची काव्यात्म पद्धतीने मांडण्यात आलेली अमूर्त चित्रे ही या चित्र प्रदर्शनाचे खास आकर्षण असून विकास जोशी यांची 10, संजय जठार यांची 12 आणि  किशोर इंगळे यांची 8 अशी एकूण 30 चित्र या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. ही सर्व चित्र ॲक्रॅलिक,ऑईल रंगातील आणि ड्राईंग असून प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत.

2 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा